आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा

नेवासा-लग्नात मानपान झाला नाही आणि दुचाकीसह मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत, या कारणावरून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातपुते चाळ, भोसले आखाडा येथे राहत असलेल्या पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा

पती गणेश एकनाथ भोसले, सासरे एकनाथ मुरलीधर भोसले, सासु रंजना एकनाथ भोसले, दीर आकाश एकनाथ भोसले (सर्व रा. कुकाणा, ता. नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पीडितेचा विवाह गणेश भोसले याच्यासोबत झाला होता. सुरूवातीचे काही महिने सुखात गेल्यानंतर ऑक्टोबर
२०२३ पासून सासरच्या मंडळींनी छळ सुरू केल्याचा आरोप आहे.

तुझ्या आई-वडिलांनी लग्नात आमच्या अपेक्षेप्रमाणे मानपान केला नाही, असे म्हणत पतीने मारहाण केली. तसेच सासरच्यांकडून वारंवार बुलेट आणि फोनचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी केली जात होती.

गुन्हा

हुंड्यासाठी तगादा लावत सासू आणि दिराने पीडितेला उपाशीपोटी ठेवून तिचा अपमान ‘केला. पैसे आणले नाही तर तुला सुखाने जगू देणार नाही अशी धमकी देत तिचा छळ सुरूच ठेवला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी पती गणेश भोसले, सासरे एकनाथ भोसले, सासू रंजना भोसले आणि दीर आकाश भोसले यांच्यावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

गुन्हा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!