नेवासा- तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, मोरगव्हाण शिवारात शेतातील विद्युतवाहक तारेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी योगेश बाळासाहेब बडाख (वय ४०, रा. नेवासा फाटा) यांनी सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मोरगव्हाण शिवारातील सचिन
अशोक धाडगे यांच्या शेतात सुरक्षिततेसाठी कंपाऊंडच्या आत ठेवण्यात आलेल्या ऍल्युमिनियम विद्युतवाहक तारा चोरट्यांनी चोरून नेल्या. अंदाजे ७०० किलो वजनाची व १५०० मीटर लांबीची ५५ मि.मी. जाडीची अल्युमिनियम तार ( ६० हजार रुपये) तसेच ३०० किलो वजनाची व ५०० मीटर लांबीची ३४ मिमी जाडीची तार ( १० हजार रुपये), असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






