आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जनगणना

आपला जिल्हा- राज्यातील शाळांना दरवर्षीप्रमाणे
यंदाही २ मे पासून १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्ट्या अंसणार आहेत. परंतु, यावर्षी जनगणनेच्या कामकाजाला सुरवात होणार असल्याने शिक्षकांना यंदा उन्हाळा सुट्ट्या मिळणार नाहीत. अंतिम सत्राच्या परीक्षा संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण होऊन १६ मे पासून त्यांना गावागावातील घरांची गणना करुन त्याच्या याद्या तयार कराव्या लागणार आहेत. यामुळे उन्हाळा सुट्टी लागली तरी देखील शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश अन्य जिल्ह्यात देण्यात आले असून नगर जिल्ह्यातील आदेशाबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जनगणना

यंदा एप्रिल महिन्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यात जनगणनेच्या कामाला सुरूवात होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात गावागावात नगर जिल्ह्यात घरांची गणना करण्यात येणार आहे. या कामात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे या काळात शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश काढण्यात येणार आहेत. सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. १६ मे ते १४ जूनपर्यंत जनगणनेअंतर्गत घरयादी व घरांची गणना करायची आहे. तत्पूर्वी, सर्वांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे कोणालाही सुट्टीच्या काळात मुख्यालय (ज्या ठिकाणी नोकरी करता ती जागा किंवा गाव-शहर) सोडता येणार नाही.

जनगणना

जनगणनेअंतर्गत. १६ मे ते १४ जून या काळात पहिल्यांदा घरे मोजायची आहेत. फेब्रुवारी २०२७ पासून लोकसंख्येची तर १ मार्च २०२७ पासून जातनिहाय जनगणना होणार आहे. तत्पूर्वी, नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानुसार २७ एप्रिल ते ८ मे या काळात प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी असणार आहेत. पण, उन्हाळा सुट्टीत १६ मे ते १४ जूनपर्यंत सर्वांना घरगणनेचे काम करावे लागणार आहे. त्या शिक्षकांना पुढे तेवढ्याच दिवसाची विशेष रजा घेता येणार आहे.

जनगणना
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनगणना
जनगणना

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनगणना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!