
सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई मधील स्वामी विवेकानंद चौकाच्या जवळ गणेशवाडी रोडवर असलेले ताडी विक्री केंद्र त्वरित बंद करण्याची मागणी सोनईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

स्वामी विवेकानंद चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेले ताडी विक्री केंद्र असून समोरून शटर बंद आहे. पाठीमागच्या बाजूकडून ही ताडी विक्री सुरू आहे. केमिकलयुक्त ताडी असल्याने आरोग्यास अपायकारक आहे. गोळ्यापासून ही ताडी तयार केली जाते.
त्यापासून आरोग्याला धोका संभवतो. त्यामुळे आरोग्यास हानिकारक असणाऱ्या य ताडीची विक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी केली जात आहे. उत्पादन शुल्क विभागाने यावर तातडीने कारवाई करून याची विक्री तातडीने बंद न केल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







