नेवासा : नेवासा येथे स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष महंमदभाई शेख टेलर यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रमाला सर्वधर्मीय बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या ईद मिलन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक महंमदभाई टेलर, फारूक शेख, रौफ शेख, वसीम शेख यांनी आलेल्या सर्वधर्मीय बांधवांचे स्वागत केले.

यावेळी जेष्ठ नेते रामभाऊ जगताप, विजय गांधी, बाळासाहेब पाटील, संभाजीराव आम आदमी पार्टीचे स्टार प्रचारक अँड. संजय सुखदान, नगरसेवक जितेंद्र कु-हे, घुले पाटील पतसंस्थेचे व्यवस्थापक लक्ष्मण नाबदे यांनी याप्रसंगी ईद मिलन कार्यक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. भाई चारा वृद्धिंगत करण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले

यावेळी नगरसेवक स्वप्नील मापारी, अनिल शिंदे, युवा विधी तज्ञ अँड. अभिजित पाटील नगरसेवक काळे, असिफभाई संभाजी धोत्रे, राजू शेख, डॉ. राहुल गवळी, अरुण पठाण, मुक्तार चव्हाण, जालिंदर जाधव, अँड. फरदिन पठाण, अनिल बोरकर, राजेंद्र थावरे, व्यापारी अनिल नळकांडे, इम्रान शफीक यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यापारी नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







