सोनई /शनिशिगंनापूर —केंद्रसरकारने कामगारांना अंधारात ठेऊन “चार श्रमसंहिताशीच्या अंमलबजावणी” च्या विरोधात मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी केंद्रसरकारचा तीव्र निषेध व्येक्त करून एक दिवसाचा काळा दिवस पाळला .काल १/४/२०२६ रोजी केंद्र सरकारने चार श्रमसंहिताशी कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याने आजचा दिवस भारतातील सर्व कामगारांसाठी काळा दिवस ठरणार आहे,यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आज मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियन चे वतीने कारखाना मेन गेटवर सर्व कामगारांना एकत्रित करून केंद्र सरकारच्या या धोरणाच्या विरोधात कडाडून प्रखर विरोध दर्शवून सर्व कामगारांनी काळया फिती लावून निषेध व्यक्त केला.

तसेच याप्रसंगी मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियन चे अध्यक्ष अशोकराव पवार, सरचिटणीस डी एम निमसे, उपाध्यक्ष कारभारी लोडे, खजिनदार सुभाष सोनवणे, सहचिटणीस भारत पटारे, कामगार संचालक विश्वास डेरे, किशोर राजगुरू, विजय गोरे, आदिनाथ शेटे, टाईम ऑफिसचे रावसाहेब शेळके, वामनराव निमसे, गोविंद कोंगे सह सर्व कर्मचारी यावेळी सहभागी झाले होते. चौकटमहाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊशंकर पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय निमसे या राज्यव्यापी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित राज्यस्तरीय बैठक घेऊन या विरोधात राज्यभर केंद्रसरकारच्या विरोधात लढा उभारू मा. डि. एम. निमसे, राज्य कामगार संघटना सरचिटणीस.*वरिष्टाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

यापूर्वी या चार “श्रम संहितांशीच्या अंमलबजावणीच्या” विरोधात देशातील अनेक कामगार संघटनांनी 12 फेब्रुवारी रोजी भारत बंद चे आवाहन यापूर्वी केलेले होते, आज केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी देशातील बँक कर्मचाऱ्यापासून शेतकरी कामगार संघटनापर्यंत विविध कामगार संघटनांनी आज यामध्ये सहभाग नोंदवला आहे. नवीन बदलामुळे देशातील कामगार वर्ग अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या चार नव्या कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांचे अधिकार हिरावले जातील, नोकरीची सुरक्षितता कमी होईल आणि कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे अधिकचे स्वातंत्र्य मिळेल, अशी भीती प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष श्री डी एम निमसे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कामगार एकजुटीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







