आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शाळा

बालाजी देडगाव – नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापक अंबादास बोरुडे सर यांचे शाळा व ग्रामस्थ यांच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी लेझीम पथकासह बोरुडे सर यांची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास घाडगे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून देशमुख सर, अनिल राजहंस सर, पत्रकार ज्ञानेश्वर फसले होते. याप्रसंगी सरपंच सतीशराव काळे यांनी सेंद्रिय शेती व आरोग्य विषयी मार्गदर्शन करून शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.

शाळा

तसेच त्यांच्या कारकिर्दीत शाळेला दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून यापुढे शाळेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी शिवाजी पाटील घोडेचोर, महेश महाराज घाडगे, अ‍ॅड. सचिन घोडेचोर, दिपक साळवे, माजी मुख्याध्यापक देशमुख सर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती बोरुडे सर यांनी शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी सरपंच सतीशराव काळे, पोलीस पाटील शिवाजीराव घोडेचोर, महेश महाराज घाडगे, विलास घाडगे, दीपक साळवे, श्रीकांत घाडगे, कृष्णा घाडगे, सुधाकर माने, मुख्याध्यापक देशमुख सर, रवी काळे, संजय घोडेचोर, राजू घाडगे, महेश शेटे, अभिजीत घोडेचोर, शिक्षक देवढे सर, उभेदळ सर, श्रीमती काळे मॅडम, श्रीमती भोगे मॅडम, लोणारे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष लोणारे सर यांनी केले.

शाळा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शाळा
शाळा
शाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!