नेवासा – अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुरेशनगर शिवारात एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे येथील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
याबाबत माहिती अशी की, अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुरेशनगर शिवारात हॉटेल शिनाईसमोर छत्रपती संभाजीनगर-कोल्हापूर या एसटी बसने (एमएच १४ एमएच ४३८४) दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील फिलिप दाविद वाघमारे व मार्थाबाई फिलिप वाघमारे हे पती-पत्नी जागीच ठार झाले. शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नेवासाफाटा येथील पत्रकार राजेंद्र वाघमारे यांचे सख्खे चुलते आणि चुलती असलेले फिलिप वाघमारे आणि मार्याबाई वाघमारे हे जोडपे आपल्या संपूर्ण कुंटूबियांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे एका लग्न समारंभाला जाऊन आल्यानंतर पुन्हा सायंकाळी
७ वाजेच्या दरम्यान नेवासाफाटा येथून आपल्या दुचाकीवरून माळीचिंचोरेकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-कोल्हापूर या बसने दुचाकील जोराची धडक दिली.

यात हे जोडपे जागीच ठार झाले. रुग्णवाहीका चालक विकास निपुंगे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. य घटनेमुळे माळीचिंचोरा आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून या दुर्दैव अपघाताच्या घटनेमुळे गावं बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







