नेवासा : मोबाईलचे व्यसन दूर करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर यांनी केलेनेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी पाथर्डी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .कळमकर यांनी आपल्या विनोदी शैलीत दूरदर्शनच्या मालिका आणि मोबाईलवरील संभाषण यामुळे पाल्यांकडे होत असलेले दुर्लक्ष ही भविष्यासाठी धोकादायक घंटा आहे त्यामुळे जागरूकपणे पालकांनी आपल्या मुलांना वाचनाची आणि मैदानावरील खेळाची गोडी निर्माण करावी असे आवाहन केले .

माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजू गायकवाड यांनी मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपली मुले मातृभाषेतून शिकली पाहिजे यासाठी मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवण्याचे आवाहन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा तसेच विविध प्रकारचे नृत्य गीते, नाटिका सादर केल्या. ‘देश नावाचं घर ‘ या गीताला पालकांनी उस्फुर्तपणे या कार्यक्रमांना प्रतिसाद दिला.मुख्याध्यापक शेषराव पाखरे यांनी प्रास्ताविक केले .या कार्यक्रमाला नाथबाबा देवस्थानचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जायगुडे , बाळासाहेब मारकळी,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजू गायकवाड,पोलीस पाटील दिलीप गायकवाड,अनिल डोले धनु काशीद,रामेश्वर चोपडे,राजेंद्र जायभाय,राजेंद्र मुंगसे,सिताराम सावंत,शिक्षक संघाचे तालकाध्यक्ष विठठल कांगुणे,

बाळासाहेब गोल्हार,संपत किर्तने,अरविंद घोडके,शिवाजी घुले,अमोल कदम व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक संतोष भांबरे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रंगनाथ गुंजाळ, रतनबाई महांडुळे,प्रणिता कुलकर्णी,यमुना वासाल,मंदाकिनी हडप यांनी विशेष परिश्रम घेतले. सुभाष चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाला माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







