नेवासा- गेल्या बऱ्याच दिवसापासून नेवासा शहराचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे त्यामुळे नेवासा शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. बऱ्याच भागात दहा दहा दिवस पाणी येत नाही, आले तर त्याला दाब ही नसतो, वीज पुरवठा ही खंडित होतो, यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी नेवासा नगरपंचायत वसूल करत असून शंभर दिवसही पाणीपुरवठा होत नाही आहे.

प्रवरा व गोदावरी नदीला पाणी असूनही पाणीपुरवठा नियमित होत नसून हे असे झाले आहे की धरण उशाला अन् कोरड घशाला, तरी येत्या सात दिवसाच्या आत नेवासा शहराचा पाणीपुरवठा नियमित झाला नाही तर नेवासा नगरपंचायत येथे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा मागणीचे निवेदन युवा नगरसेवक स्वप्निल मापारी यांनी नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी निखिल फराटे साहेब यांना देण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







