नेवासा – वैध एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने मंदिर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवर्य वेदांताचार्य देविदास बाबा म्हस्के यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमांना भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मंदिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सेवा देण्याचा उपक्रमही राबविण्यात येत असून, शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मंदिर प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या सेवाभावी कार्याला बळ मिळावे, या उद्देशाने गुरुवर्य देविदास बाबा यांनी काही गावांना धान्यदानाचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत तरवडी, सुदामपूर, कुकाणा आणि भेंडा येथील ग्रामस्थांनी वैध एकादशीच्या निमित्ताने तब्बल ३१ क्विंटल गव्हाचे धान्य संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे अर्पण केले. ग्रामस्थांच्या या सेवाभावी योगदानाचे मंदिर समिती आणि बाबाजी यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी गुरुवर्य देविदास बाबा म्हस्के व अध्यक्ष अभंग साहेब विश्वस्त मंडळ यांनी सर्व ग्रामस्थांचा सत्कार करून, माऊली सेवेकऱ्यांनी यापुढेही अशाच प्रकारे समाजोपयोगी आणि सेवाभावी उपक्रमांत सहभागी व्हावे, अशी भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे धार्मिक श्रद्धेबरोबरच समाजसेवेचा संदेशही अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







