आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
निवडणूक

नेवासा – नेवासा तालुक्यात निवडूक आयोगाकडून राबविण्यात आलेल्या एसआईआर प्रक्रियेचा व निवडणूक आयोगाचा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर निषेध करण्यात आला.
नुकतीच निवडणूक आयोगाकडून राज्यभर विशेष सखोल मतदार पडताळणी (एसआईआर ) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे अनेक मतदारांना आपल्या हक्काच्या मतदानाच्या अधिकारास मुकावे लागले आहे.याला कारणीभूत असलेले फॉर्म सहा मधील बदलेले स्वरूप, मतदार यादीतून नावे वगळणे वा नोंदवणे एसआईआर प्रक्रियेतील याद्यांचे नवी दिल्लीत होत असलेले केंद्रिकरण. याविषयीं आयोगामध्ये असलेले मतभेद अशी अनेक कारणे कारणीभूत ठरली आहे.

निवडणूक

नेवासा तालुक्यात देखील गेल्या सहा महिन्यापासून एसआईआर प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये तब्बल वीस हजार पाचशे नावे कायमस्वरूपी वगळण्यात आली तर एकोणीस हजार सातशे पन्नास हयात असलेल्या मतदारांना बीएलओ कडून नावे वागळण्याच्या व कागदपत्र पूर्ततेच्या नोटीशा देण्यात आल्या.यामुळे या मतदारांची मोठी धावपळ उडाली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या नेतृत्वात नेवासा तहसीलदार व निवडूक अधिकारी यांची भेट घेऊन ज्या मतदारांना नोटीसा दिल्या त्यांना कोणत्याही अटीशिवाय तातडीने यादीत समाविष्ट करून घेण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. तातडीने समावेश न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.

निवडणूक

यावेळी सरकारने राबविलेल्या प्रक्रियेचा तसेच निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणपत मोरे, अध्यक्ष पोपट सरोदे,कैलास बोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इरफान शेख, संदीप क्षीरसागर,संदीप केंदाळे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अंजुम पटेल यांनी अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केले जात आहे त्यांचा अधिकार हिरवण्याचे पाप मोदी सरकार करत आहे त्यामुळे आता जागरूक होण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट केले.

निवडणूक


यावेळी नेवासा निवडणूक अधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.


नेवासा तालुक्यात वीस हजार नावे कायमस्वरूपी वगळणे, व वीस हजार मतदारांना जे हयात आहे त्यांना वगळण्याच्या नोटीसा देणे ही अत्यन्त गंभीर बाब आहे. मतदान करणे मूलभूत अधिकार असून त्याला हिरावून घेणे आयोगाचा अधिकार नाही. याविरोधात मोठे जण आंदोलन उभारणार- संभाजी माळवदे.

निवडणूक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निवडणूक
निवडणूक
निवडणूक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निवडणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!