
नेवासा : नेवासा पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट देत माऊलींच्या पवित्र ‘पैस खांबा’चे दर्शन घेतले.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आध्यात्मिक स्थळाला भेट देत दर्शन घेतल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना निरीक्षक सागर ढिकले म्हणाले की, “या मंदिराबाबत खूप काही ऐकले होते. जगाच्या पाठीवर ‘खांबा’साठी असलेले हे एकमेव मंदिर आहे. माऊलींनी पवित्र ज्ञानेश्वरी याच ठिकाणी सांगितली, माऊलींच्या कृपेने आज येथे दर्शनाचा योग आला, हे माझे भाग्य आहे.”
या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भक्तांची उपस्थिती होती. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षकांनी घेतलेले हे दर्शन धार्मिक श्रद्धा आणि कर्तव्यनिष्ठेचा सुंदर संगम असल्याचे नागरिकांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







