
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील चांदा येथे मागील भांडणाच्या कारणावरून तरुणावर चाकू हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी गणेश ंनारायण पाचोरे (वय.२७) रा. चांदा हे दि. १० रोजी सकाळी ९.३० वाजता आपल्या घरासमोरील रस्त्यावर उभे असताना त्या ठिकाणी आरोपी श्रीकांत लक्ष्मीकांत कर्डीले हा आपल्या दुचाकीवरून आला.

त्याने मागील भांडणाचा राग मनात धरून त्याचे हातातील लोखंडी चाॅपरने ने डाव्या बाजुच्या बरगडी खाली मारून व डाव्या हातावर, डाव्या मांडीवर वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले तसेच शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दि १३ रोजी फिर्यादी यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

फौजदार अडकिते यांनी अहील्यानगर येथील खाजगी रुग्णालयात नोंदविलेल्या जबाबा वरुन गुन्हा र नं. १८३/२०२६ बी एन एस चे कलम ११८(२),३५२,३५१(२)(३)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







