आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रेशीम


घोडेगाव –-केंद्र सरकारच्या ‘मेरा रेशीम, मेरा अभियान’ अंतर्गत कर्नाटक राज्यातील केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथील रेशीम शास्त्रज्ञ डॉ. करण सतीश यांनी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील प्रगतशील शेतकरी कैलास शिंदे यांच्या रेशीम उद्योगाला भेट देऊन रेशीम शेती व उद्योगातील विविध बाबींची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत रेशीम उद्योगातील अडचणी, समस्या तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

रेशीम


कैलास शिंदे हे गेल्या पंधरा वर्षांपासून रेशीम उद्योग करत असून, या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी रेशीम शेतीमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या रेशीम उद्योगाला भेट देताना डॉ. करण सतीश यांनी रेशीम किड्यांचे संगोपन, संगोपन व्यवस्थापन, चॅकी व्यवस्थापन तसेच तुती बागेच्या व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रेशीम उत्पादन वाढविताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची त्यांनी माहिती घेतली.

रेशीम


रेशीम किड्यांच्या संगोपनातील स्वच्छता, तापमान व आर्द्रतेचे व्यवस्थापन, योग्य खाद्य व्यवस्थापन तसेच तुती बागेची निगा याबाबत डॉ. सतीश यांनी मार्गदर्शन केले. उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रेशीम उद्योगात येणाऱ्या अडचणींवर शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना केल्यास उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा रेशीम कार्यालयाचे जिल्हा रेशीम अधिकारी संदीप आगवणे, सहाय्यक रेशीम अधिकारी दळवी, ग्रीन स्मार्ट प्रकल्पाचे हर्षल आगळे, सहाय्यक नंदकिशोर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

रेशीम

या भेटीदरम्यान रेशीम उद्योगाच्या विकासासाठी शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
गेल्या पंधरा वर्षांपासून रेशीम उद्योगाशी जोडलेल्या कैलास शिंदे यांच्या अनुभवाची माहिती घेत डॉ. करण सतीश यांनी प्रत्यक्ष शेतावर पाहणी करून स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना सुचविल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या भेटीमुळे करंजगाव परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतींची माहिती मिळण्यास मदत झाली.

रेशीम
रेशीम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रेशीम
रेशीम
रेशीम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रेशीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!