
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील कौठा येथे शेतातील बारे मोडल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी शिवाजी भाऊसाहेब काळे (वय.४४) हे त्यांच्या शेतात जात असताना आरोपी यांनी तु शेतातील पाईपलाईन चे बारे का मोडले या कारणावरून लाकडी दांडके, लोखंडी गज, गियरचे दांडके, व लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली असल्याचे दि. १३ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

त्या नुसार आरोपी शशिराव रावसाहेब शेंडकर, सोपान रावसाहेब शेंडकर, सौरभ शशिराव शेंडकर, गौरव शशिराव शेंडकर सर्व राहणार कौठा यांच्या विरुध्द गुन्हा र नं. १८६/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब तुपे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







