आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
हरिनाम सप्ताह

मधुकर महाराज सायाळकर यांचे प्रभावी निरूपण; व्यसनमुक्ती, मातापित्यांची सेवा व आध्यात्मिक जीवनाचा संदेश

घोडेगाव : राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात हरिभक्त परायण मधुकर महाराज सायाळकर यांनी संत नामदेव महाराजांच्या ‘हेचि देवा पै मागत । चरणसेवा अखंडित । वास द्यावा पंढरीचा । सदा संग हरिदासाचा…’ या अभंगावर प्रभावी निरूपण केले.

हरिनाम सप्ताह

कीर्तनातून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना मधुकर महाराज सायाळकर म्हणाले, “देवाची भक्ती करा, निर्व्यसनी राहा आणि परमेश्वराने दिलेले हे अनमोल शरीर जपा. आई-वडिलांची सेवा करा. आध्यात्मिक कार्यात स्वतःला झोकून देत जीवन सार्थकी लावा,” असे आवाहन त्यांनी केले.

संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून परमेश्वराकडे भौतिक सुख-संपत्तीची मागणी न करता अखंड चरणसेवा, पंढरीचा वास आणि हरिदासांचा सहवास यांची मागणी केली आहे. जन्म कोणत्याही जातीमध्ये झाला तरी हरिभक्तीपासून दूर जाऊ नये, ही भावना त्यांच्या अभंगातून व्यक्त होते. याच आध्यात्मिक विचारांचा संदर्भ देत महाराजांनी भाविकांना भक्ती, संस्कार, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.

हरिनाम सप्ताह

या वेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य कैलास महाराज पवार व संपत महाराज दानवे यांनी गायनाची साथ दिली. तसेच प्रसिद्ध मृदुंगाचार्य ऋषिकेश महाराज फटांगरे व विष्णू महाराज गांडुळे यांनी आपल्या प्रभावी मृदुंगवादनाने कीर्तनात रंगत आणली. भक्तिरसात रंगलेल्या या कीर्तन सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी राजू भाऊ ढगे, अशोकराव ढगे, रामनाथ दगडू नवले, नामदेव बर्डे, धनंजय पटारे, रामभाऊ नवले व सरपंच दीपक नवले,नितीन नवले यांनी विशेष परिश्रम घेतले. सप्ताहाच्या नियोजनापासून विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामस्थांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानामुळे सप्ताहातील धार्मिक कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडत आहेत.

हरिनाम सप्ताह

कीर्तनानंतर सप्ताह समितीच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत अखंड हरिनाम सप्ताहातील भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.

हरिनाम सप्ताह
हरिनाम सप्ताह

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हरिनाम सप्ताह
हरिनाम सप्ताह
हरिनाम सप्ताह

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हरिनाम सप्ताह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!