
नेवासा – येथील यशवंत स्टडी क्लब येथे आज पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांनी विद्यार्थ्यांना भेट देत स्पर्धा परीक्षा तयारीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा नियमित सराव आणि सोशल मीडियापासून शक्य तितके दूर राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम, शिस्त आणि योग्य नियोजनाच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

यावेळी सुमय्या पठाण हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांनी तिच्या यशाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवीदास साळुंखे यांनी केले. प्रास्ताविक महेश मापारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयदिप जामदार यांनी मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







