आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
प्रवीण डोंगरे

TVK सरकारचा पहिला मोठा प्रशासकीय निर्णय; विजय यांच्या ‘विश्वासू’ अधिकाऱ्यांमध्ये प्रवीण डोंगरे चर्चेत, तर त्रिची पूर्व पोटनिवडणुकीत अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा

प्रवीण डोंगरे

तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने सत्तेवर झेंडा रोवला आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय यांनी प्रशासनातही वेगाने बदल सुरू केले असून, त्याचा पहिला मोठा परिणाम आता पाहायला मिळत आहे.
राज्यातील पाच भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकाऱ्यांसह सहा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांची तिरुचिरापल्ली जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलीमुख्यमंत्री थलपती विजय यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सध्या तमिळनाडूच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रवीण डोंगरे

डिसेंबर 2016 बॅचचे IPS अधिकारी असलेले प्रवीण डोंगरे हे कर्तव्यदक्ष आणि कठोर अधिकारी म्हणून तमिळनाडूत (Tamil Nadu) ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तिरुवेरुंबूर येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून केली होती.

सुरुवातीपासूनच त्यांनी दमदार कामगिरी करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली..
यापूर्वी ते चेन्नईच्या पश्चिम विभागातील दक्षता आणि पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागात कार्यरत होते. त्यांच्या कार्यशैलीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांची विशेष छाप निर्माण झाली होती. तमिळनाडूचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. मणिवसन यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.विशेष म्हणजे, ज्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात डोंगरे यांनी पूर्वी कनिष्ठ पदावर काम केले होते, त्याच जिल्ह्यात आता त्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या ‘विश्वासू अधिकाऱ्यां’मध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे.

प्रवीण डोंगरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रवीण डोंगरे
प्रवीण डोंगरे
प्रवीण डोंगरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रवीण डोंगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!