आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शेतकरी

नेवासा-शेतकरी संरक्षण कायदा संदर्भीय मसुदा तयार करण्यासाठी राज्यस्तरीय समिती कार्यरत होती या समितीचे अध्यक्ष व जेष्ठ कृषी वैज्ञानिक डॉक्टर मुकुंदराव गायकवाड सदस्य संभाजीनगर हायकोर्ट चे नामवंत वकील एडवोकेट अजितराव काळे प्रदेशाध्यक्ष अशोक सब्बन व माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी अगोदर चार मीटिंग घेऊन या संदर्भात माहिती गोळा करून मसुदा तयार केला. डॉक्टर मुकुंदराव गायकवाड यांनी जगातील सर्व देशांमध्ये शेतकरी संरक्षण कायद्याचा अभ्यास करून 500 पानाचा अहवाल तयार केला त्यानंतर त्यांनी त्यामधील निष्कर्ष व भारतातील शेतकऱ्यांसाठी योग्य अशी संदर्भ 40 पानात तयार केले.

शेतकरी

अमेरिका येथे निर्माण इसराइल येथे ॲग्रोस्को, नेदरलँड व इतर जागतिक कायद्यांचा अभ्यास केला जगामध्ये शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विविध प्रकारचे कायदे आहेत तथापि भारतामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असूनही कायदा नाही अशी या राज्यस्तरीय समितीचे निरीक्षण नोंदविण्यात आले आज आपल्या देशामध्ये ग्राहक संरक्षण पत्रकार संरक्षण डॉक्टर दवाखाना संरक्षण इत्यादी प्रकारचे संरक्षण कायदे आहेत वन्य प्राण्यांना सुद्धा संरक्षण देणारा कायदा आहे तथापि शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कायदा नाही अशी खंत मीटिंगमध्ये माजी कुलगुरू डॉ अशोकराव ढगे यांनी प्रस्तुत केली

शेतकरी

एडवोकेट काळे यांनी कायद्याचा अभ्यास करून शेतकरी संरक्षण कायदा 2026 मध्ये वेगवेगळे कलम उदाहरणार्थ जोखीम व्यवस्थापन अतिवृष्टी ढगफुटी दुष्काळ बिबट्याचा हल्ला साप चावणे यासारख्या गोष्टीवर कलमे तयार केली कृषी वैज्ञानिक डॉक्टर मुकुंदराव गायकवाड यांनी जगातील सर्व शेतकरी संरक्षण कायद्यांचा पुणे येथील लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करून 500 पानाचा संदर्भीय अहवाल तयार केला अशोक सब्बन यांनी हा मसुदा देशाचे पंतप्रधान, निती आयोग, केंद्रीय कृषिमंत्री तसेच मुख्यमंत्री राज्य कृषी मंत्री व कृषी मूल्य आयोगाकडे सादर करावा अशी अशी विनंती थोर समाज सुधारक अण्णा हजारे यांना केली.

शेतकरी

हजारे यांनी मिटींगचे अध्यक्ष स्थान भूषवून सखोल मार्गदर्शन केले शेतीच्या संदर्भात केंद्र व राज्य सरकारचे धोरण बदलणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादित करून हा मसुदा सर्व संबंधितांना पाठवण्या संदर्भात अश्वाषित केले याप्रसंगी कार्लस साठे नितीन भालेराव व उपस्थित शेतकऱ्यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे यासाठी हा मसुदा तातडीने स्वीकारावा अशी सूचना व्यक्त केली

शेतकरी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेतकरी
शेतकरी
शेतकरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!