नेवासा-पर्यावरण दिनानिमित्त नेवासा येथील मॉर्निंग वॉक अमरनाथ ग्रुपच्या वतीने देवगड रस्त्यावर लावलेल्या शेकडो वृक्षांना टँकरद्वारे पाणी देऊन जलाभिषेक घालण्यात आला. अमरनाथ ग्रुपचे प्रमुख नंदकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

उपक्रमामध्ये नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व अमरनाथ ग्रुपचे मार्गदर्शक नंदकुमार पाटील, वृक्ष संवर्धन समितीचे व्यवस्थापक रामनाथ जाधव, रवींद्र जोशी, मेजर अरुण धनक, दिलीप जगदाळे, किशोर गारुळे, व्यापारी शशिकांत नळकांडे, माजी नगरसेवक अंबादास ईरले, शंभूराजे जंगले, पत्रकार सुधीर चव्हाण, नगरसेवक जालिंदर गवळी, शंकर ओहोळ, राजेंद्र महाजन, बजरंग ईरले, ज्ञानेश्वर ऊगले, बँक मॅनेजर चंद्रकांत काटे, सुरेश शिंदे यांनी सहभाग नोंदवला.

अमरनाथ ग्रुपने देवगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविध प्रकारची सुमारे दीडशे वृक्ष दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेली आहे. कडक उन्हाळयात देखील या वृक्षांचे संगोपन करण्याचे काम ग्रुपच्या वतीने करण्यात आले. वृक्ष संवर्धनासाठी जागतिक पर्यावरण दिनी राबविण्यात आलेल्या वृक्ष जलाभिषेक उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून अमरनाथ ग्रुपला धन्यवाद दिले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







