आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
लाँड्री

नेवासा : प्रामाणिकपणा, माणुसकी आजही जिवंत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. घाईघाईत कष्टाची पुंजी खिशात विसरून गेलेल्या एका ग्राहकाचे पैसे स्वतः काळजी करीत सुरक्षित परत करणाऱ्या एका लॉन्ड्री चालकाने इमानदारीचा अनोखा आदर्श घालून दिला. पैशांपेक्षा माणसाचा विश्वास मोठा असतो, हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. नेवासा येथील गौरव बेहळे यांनी आपले कपडे नेहमीप्रमाणे ‘शिव लॉन्ड्री’ मध्ये इस्त्रीसाठी दिले होते.

लाँड्री

लॉन्ड्री चालक शिवभाऊ राजगिरे हे अत्यंत कष्टाने व्यवसाय सांभाळतात. नेहमीप्रमाणे कपडे इस्त्री करताना त्यांना गौरव बेहळे यांच्या कपड्याच्या खिशात नोटांची घडी जाणवली. त्यांनी खिसा तपासला असता, त्यात तब्बल ४,७४० रुपये मिळून आले. शिवभाऊ राजगिरे यांनी जराही वेळ न घालवता तातडीने गौरव बेहळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. भाऊ, तुमच्या कपड्याच्या खिशात पैसे राहिले आहेत, ते माझ्याकडे सुरक्षित आहेत, घेऊन जा. त्यांनी बेहळे यांना लॉन्ड्रीवर बोलावून घेतले आणि ती संपूर्ण रक्कम अत्यंत आदराने त्यांच्या स्वाधीन केली.

लाँड्री

आपले विसरलेले पैसे आणि
समोरच्या माणसाचे हे अथांग इमान पाहून गौरव बेहळे भावूक झाले. त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि शिवभाऊ राजगिरे यांच्या या प्रामाणिक वृत्तीबद्दल मनापासून आभार मानले. पैशाची श्रीमंती अनेकांकडे असते, पण मनाची श्रीमंती आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव फार कमी लोकांकडे असते. ‘ग्राहक देवो भव’ ही भावना केवळ शब्दांत न ठेवता ती कृतीत आणणाऱ्या शिवभाऊ राजगिरे यांच्यावर सध्या संपूर्ण नेवासा परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लाँड्री
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लाँड्री
लाँड्री
लाँड्री

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लाँड्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!