
नांदुर शिकारी (प्रतिनिधी) : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेतून नांदुर शिकारी येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रेरणेने आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक भागवत दाभाडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदुर शिकारी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना उजळणी पुस्तके, वह्या तसेच विविध शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमास ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज लिपणे, पांडुरंग गवळी, अभिजित देशमुख, ग्रामसेवक झिरपे भाऊसाहेब, विकास राजमाने, सोमनाथ खलाटे, सोमनाथ लिपणे, सुरेश मुळक, शिक्षक श्री सय्यद इन्नुस, मुटकुळे बाबुराव , काशीद पंढरीनाथ ,वाघुले तुकाराम, सरोदे दीपक ,नेहुल कल्याणराव ,मुळे बाळकृष्ण,नवले भाऊसाहेब यांच्यासह ग्रामस्थ, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जोपासली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासारखा उपक्रम हा खऱ्या अर्थाने समाजहिताचा असून अशा उपक्रमांमुळे शिक्षणाला बळ मिळते,” अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







