आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
तिरट जुगार
तिरट जुगार

नेवासा – नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील तरवडी गावच्या शिवारात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर नेवासा पोलिसांनी धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटारसायकलींसह तब्बल १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तिरट जुगार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तरवडी गावच्या शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, नारायण डमाळे, श्रीनाथ गवळी, परमेश्वर गहाळ, सुनील गंगावणे, भारत बोडके, गणेश जाधव, नवनाथ शेकडे तसेच होमगार्ड यांना कारवाईचे आदेश दिले.

तिरट जुगार

पोलीस हवालदार अजय साठे यांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला असता पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला तिरट जुगार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी सहा जणांना पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकली असा एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तिरट जुगार

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सुनील एव्हाण खरात (रा. तरवडी), दादासाहेब काशिनाथ वाघडकर (रा. भेंडा), आकाश उत्तम घुटे (रा. कोकणात), दत्तात्रय हरिचंद्र साळुंखे (रा. कुकाणा झोपडपट्टी), ज्ञानेश्वर मधुकर हरवणे (रा. कुकाणा) आणि पांडुरंग लक्ष्मण गोल्हार (रा. सुकळी, ता. नेवासा) यांचा समावेश आहे.

तिरट जुगार

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर कृष्णा गहाळ यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार अजय साठे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू आणि पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, सुनील गंगावणे, परमेश्वर गहाळ, नवनाथ शेकडे, गणेश जाधव, भारत बोडके तसेच होमगार्ड प्रशांत भिसे, सचिन पंडित, प्रमोद गीते, संतोष चव्हाण आणि मच्छिंद्र भापकर यांनी सहभाग घेतला.

तिरट जुगार

दरम्यान, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य अथवा संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ नेवासा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी.

तिरट जुगार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तिरट जुगार
तिरट जुगार
तिरट जुगार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तिरट जुगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!