नेवासा- तालुक्यातील फत्तेपूर येथील सरपंचांच्या कुटुंबियाने शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे जि.प.सार्वजनिक बांधकाम व गट विकास अधिकारी नेवासा यांच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निलोफर शेख यांचे सरपंचपद व सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश दिला आहे.

२०२३ मध्ये फत्तेपूर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून लोकनियुक्त सरपंच म्हणून निलोफर इस्माईल शेख निवडून आल्या आहेत. मात्र त्यांच्या एकत्रित कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या सरकारी जागेत घोडेगाव कुकाणा रस्त्यालगत फत्तेपूर येथे अतिक्रमण करून बांधकाम केले. मिळकत मालमत्ता क्रमांक ९४ च्या चारही बाजूने अतिक्रमण करत, कंपाउंड करून उपभोग घेत असल्याची तक्रार अर्जदार संगीता दत्तात्रय धुमाळ यांनी दाखल केली होती.

यावर शेख यांनी धुमाळ या निवडणुकीत पराभूत झाल्याने आकस बुध्दीतून आरोप करत असल्याचा दावा करून मिळकत ९४ ही शासकीय वाटपाने मिळाल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती व कागदपत्रांची पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम खात्याच्या संबंधितांनी पाहणी करून आपला अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निलोफर शेख या फत्तेपूर येथील ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून राहण्यास अनर्ह ठरत असल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात येत असल्याचे तसेच त्यांचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला आहे. त्यांना हा निर्णय मान्य नसल्यास १५ दिवसांत विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील दाखल करता येईल, असेही आदेशात म्हटले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







