आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पाणी
पाणी

नेवासा-पावसाळा लांबणीवर गेल्याने तालुक्यात पाण्याची टंचाई तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यामुळे मुळा धरणाच्या पाण्याचे रोटेशन नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आले. मुळा उजवा कालवा सिंचनाखाली तालुक्यातील सुमारे ६० ते ७० टक्के क्षेत्र येते. या क्षेत्रातील अंतिम टोकावर असलेल्या वाकडी, शिरजगाव, सुकळी, वडुळे, सलाबतपूर, गोपाळपूर, खडका, जळके, तामसवाडी, सोनई, करजगाव, खरवंडी, उस्थळ दुमाला, तरवडी, कुकाणा आणि चिलेखनवाडी या गावांपर्यंतही यंदा प्रभावीपणे सिंचनाचे पाणी पोहोचले.

पाणी

यंदा पाण्याची उपलब्धता मर्यादित असतानाही आ. लंघे यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे रोटेशनचा कालावधी वाढविण्याची मागणी सातत्याने लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आवर्तनाचा कालावधी वाढविण्यात आला. पाण्याचे रोटेशन सुरू असताना केवळ आदेशावर न थांबता आ. लंघे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून संपूर्ण परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवले. कोणत्याही गावावर अन्याय होऊ नये, पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचावे आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यालाही न्याय मिळावा, यासाठी त्यांनी प्रभावी समन्वय साधला.

पाणी

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविणे आणि त्यांच्या पिकांचे नुकसान टाळणे हेच आमचे उद्दिष्ट होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध करून देता आल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले.

पाणी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाणी
पाणी
पाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!