आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आरोपी

नेवासा- मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

आरोपी

सदर आदेशानुसार श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरिष भोये, पोउपनि संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार विष्णु वागवत, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, वाळासाहेब खेडकर, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.

आरोपी

दिनांक २२/०६/२०२६ रोजी नमुद पथक हे नेवासा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील आरोपी नामे श्रावण पिंपळे हाछत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर जाणारे रोडवर जिओ पेट्रोल पंपाजवळ हांडीनिमगाव शिवारात गावटी कट्टा (पिस्टल) कब्जात बाळगुन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता हांडीनिमगाव शिवारात एक मोकळ्या मैदानात संशयीत रित्या उभा असलेला दिसुन आला. तेव्हा पथकाने छापा टाकुन इसम ताब्यात घेवुन त्यास नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव श्रावण सुरेश पिंपळे वय-२८ वर्षे रा. नैताळे, ता.निफाड, जि. नाशिक असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व नाशिक या गुन्ह्यामध्ये एकुण १५ गुन्हे दाखल आहे.

आरोपी

ताब्यातील इसमाची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन १) ३०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), २) २०००/- रुपये किमतीचे ०२ जिवंत काडतुसे, १०,०००/-रु कि.ची एक मोवाईल असा एकुण ४२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

-ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ/४३५ बाळासाहेब सुभाष खेडकर नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. ५२४/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.

आरोपी

सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!