आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मक्तापूर
मक्तापूर

नेवासा : मौजे मक्तापुर ते म्हसले रस्त्याचे काम मागील ०९ महिन्यापासून बंद झालेले आहे, त्यामुळे सदर रस्त्यावरून येणाऱ्या शाळकरी मुलांची व प्रवाशांचे खूप हाल होत आहे, त्यामुळे सदर रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ चालू व्हावे यासाठी प्रशासनाने सबंधित ठेकेदार यांना सुचना देऊन सदर काम तत्काळ चालू करावे अशी मागणी मराठा सूकाणु समितीचे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, श्री. गणेश लक्ष्मण झगरे यांनी मा. तहसीलदार साहेब, नेवासा, मा. पोलीस निरीक्षक साहेब, नेवासा तसेच मा. सार्वजनिक बांधकाम कार्यालय, नेवासा यांना लेखी निवेदन देऊन कळवले आहे,

मक्तापूर

तरी प्रशासनाने सदर निवेदनाचे दिनांक २३ जुन २०२६ पर्यंत दखल न घेतल्यास व सदर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी सबंधित ठेकेदारास सुचना न दील्यास दिनांक २३/०६/२०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर महामार्गावर श्री. गणेश लक्ष्मण झगरे, (मराठा सूकाणु समिति प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य.) व मक्तापुर व म्हसले ग्रामस्थासह रास्ता रोको आंदोलन करणार आहे अशी सुचना निवेदनाद्वारे प्रशासनास दिलेली आहे.

मक्तापूर

तरी प्रशासनाने सदर दिलेल्या निवेदनाची वेळेत दखल घ्यावी असा इशारा गणेश झगरे व मक्तापूर व म्हसले ग्रामस्थ बाबासाहेब ज्ञानदेव शिरसाठ, बाळासाहेब दत्तू शिरसाठ, भानुदास शिरसाठ, आबासाहेब शिरसाठ, जालिंदर नवले, बहिरनाथ शिरसाठ, रामेश्वर नवले, दत्तात्रय शिरसाठ, दत्तात्रय बाबासाहेब शिरसाठ, मक्तापूरचे मा. सरपंच पुनमचंद साळवे, सचिन गायकवाड, गोरक्षनाथ नवघरे, लहानू नवघरे, आदि ग्रामस्थांनी देण्यात आला आहे.

मक्तापूर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मक्तापूर
मक्तापूर
मक्तापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मक्तापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!