
नेवासा : नेवासा आठवडे बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून, दर रविवारी या बाजारात पोलिस पेट्रोलिंग करण्याची मागणी नगरसेवक स्वप्नील मापारी व सहकाऱ्यांनी यांनी केली आहे.

नेवाशात दर रविवारी आठवडे बाजार भरतो. बाजारकरूंची गर्दीही मोठ्या प्रमाणात असते. परंतु या बाजारात भुरट्या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांचे पर्स, नागरिकांचे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन हे चोरटे अंगासमोर पिशवी आडवी करून खिशातून मोबाईल, महिलांच्या हाती पर्स अलगदपणे चोरीचा फंडा करतात. मध्यंतरी एका चोरट्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. दर रविवारी आठवडे बाजारात पोलिस कर्मचाऱ्यांची पेट्रोलिंग सुरू केली, तर या भुरट्या चोऱ्यांना आळा बसेल. याकरिता नव्याने आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बाजारात पोलिस पेट्रोलिंग करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मापारी व सहकाऱ्यांनी केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







