नेवासा : तालुक्यातील मंगळापुर शिवारात एक भव्य जानमे एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प उभारला जात आहे. या संदर्भातील चर्चा प्रकल्पाचे मालक विराज लधानी शेठ मुंबई यांनी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे टेक्निकल ॲडव्हायझर यांच्या समवेत केली. मंगळापूर येथे 35 एकराच्या परिसरात हा हवामान पूरक व प्रदूषण विरहित प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात डॉक्टर ढगे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

तसेच नेपियर गवत नवीन जातीची लागवड करून कच्चामाल हा शेतकऱ्याकडून खरेदी करण्यात येईल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी टेक्निकल ॲडव्हायझर डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली. या परिसरातील युवकांना या निमित्ताने काही प्रमाणात रोजगार निर्माण होईल. कंप्रेड बायोगॅस ही यापुढील भविष्यात अत्यंत महत्त्वाचे उत्पादन ठरणार आहे. नेवासा तालुक्यातील गोदाकाठच्या शेतकऱ्यांना व युवकांना याचा फायदा होऊन तालुक्याच्या वैभवात भर पडेल असा विश्वास टेक्निकल ॲडव्हायझर डॉक्टर अशोकराव ढगे यांनी व्यक्त केला आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







