आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
एकादशी


नेवासा ( शहर प्रतिनिधी ) श्री.संत ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सभागृहात कामिका एकादशी निमित्ताने भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर विश्वस्त मंडळ यांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे ठरले.

एकादशी


संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या सभागृहात झालेल्या बैठकी प्रसंगी ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के,आमदार विठ्ठलराव लंघे,संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग,तहसीलदार सजंय बिरादार,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे,नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे,महावितरणचे काकासाहेब बोराडे,रवी कांबळे,
बांधकाम चे श्रेयस दराडे, डेपो मॅनेजर संदिप ढवळे आदी उपस्थित होते.
प्रथम विश्वस्त कैलास जाधव यांनी कामिका एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता विविध विभागांच्या नियोजन जवाबदारी यांची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

एकादशी


बैठकीस उपस्थित विश्वस्त व नागरीकांनी रस्त्यांची डागडुजी, परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, मोबाईल टॉयलेट्स, पार्किंग व्यवस्था, अग्निशामक व्यवस्था, आरोग्य पथकांची नियुक्ती,लाईट व्यवस्था ,पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था आदी करावयाच्या उपाय योजना बाबत सुचना केल्या.
अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी वाहतूक नियंत्रण आणि पहाटे २:३० पासुन पोलिस बंदोबस्त ,बॅरेकेटीग करण्यात येऊन भाविकांची सेवा आणि सुरक्षितेच्या दृष्टीने करावयाच्या उपाय योजना या बाबत बैठकीत मार्गदर्शन केले.
ह.भ.प. म्हस्के महाराज यांनी कामिका एकादशीनिमित्त २५० दिंड्या मंदिर प्रांगणात येणार असून त्यांचा सन्मान तसेच त्यांचे दिंडी प्रमुख, सेवक यांची नोंद घेतली जाणार असुन भाविकांच्या सेवा सुविधा बाबत प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

एकादशी


आमदार विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की, श्री .संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे कामिका एकादशीनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात तालुक्यातील प्रत्येक गावातून तसेच शेजारील तालुक्यातून पायी दिंड्या येतात या सर्व भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी संतर्क रहावे, विषेशता पोलीस प्रशासन, विज वितरण, आरोग्य, नगरपंचायत यांच्यावर मोठी जवाबदारी आहे.
वाहन तळाचे नियोजन करण्यात येवुन, श्री खोलेश्वर गणेश मंदीरा पर्यंत वृध्द भाविकांना मार्केट कमेटी व नेवासा बुद्रुक येथुन येण्या जाण्यासाठी प्रवासी वाहतूक रिक्षा व्यवस्था करावी, कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी विज वितरण कंपनीने विज जोड द्यावेत तसेच अखंड विज पुरवठा करवा या बरोबर सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्यरत होऊन भाविकाला कोणतीही अडचण होऊ नये, गर्दी सुरळीत वाहती राहावी, यासाठी तयारी समन्वय ठेऊन काम करावे .

एकादशी


यावेळी जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे,गट नेते महेश लोखंडे, नगरसेवक अंकुश म्हस्के,स्वप्नील मापारी, प्रवीण सरोदे, संदीप सरकाळे, जालिंदर गवळी, डाॅ. मनिषा वाघ, योगेश रासने आदी उपस्थित होते.

कामिका एकादशीच्या दिवशी व्हीआयपी दर्शन बंद – वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के
कामिका एकादशी निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पहाटे अभिषेक झाल्यानंतर दर्शन बारी व्यतिरिक्त व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबत सर्वानुमते ठरले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एकादशी
एकादशी
एकादशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एकादशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!