पाचेगाव फाटा (वार्ताहर)आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना सन २०२५-२६ चे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यात नेवासा तालुकास्तरीय पुरस्कार पुनतगाव ग्रामपंचायतीने दुसरा पटकावला असल्याने गावातील ग्रामस्थांनी आनंद साजरा करून समाधान व्यक्त केले आहे.

तालुका स्तरीय पुरस्कार आदिशक्ती जाहीर पुरस्काराने गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन वाकचौरे, उपसरपंच सौ छय्या वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी सतिष मोटे यांना विकास कामांना भरभरून प्रतिसाद व योगदान दिल्याने आपण या बक्षीस पात्र असल्याचे ग्रामपंचायत प्रशासना कडून सांगितले आहे.
या अंतर्गत ग्रामपंचायत पुनतगाव ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांना हा पुरस्कार मिळविण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागेल.त्यात महिला व बाल कल्याण विभागांच्या विविध योजना यशस्वीरीत्या राबवून महिलांच्या सशक्तिकरणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत पुनतगांव यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

ग्रामपंचायत पुनतगांव यांनी महिला व बाल कल्याण विभागांच्या प्रमुख योजना,महिला सशक्तिकरण व स्वावलंबन,बाल संगोपन व संरक्षण,कुपोषण निर्मूलन,महिला आरोग्य व पोषण,महिला बचत गट व आर्थिक सक्षमीकरण,जेंडर समता व जनजागृती उपक्रम,महिला सशक्त, तर समाज समर्थ, समाज समर्थ, तर देश समृद्ध अशी घोषवाक्य तयार गावाचा विकास केला आहे.
शासनाच्या मुख्यमंत्री पंचायतराज मध्ये उत्स्फूर्तपणे गावातील लोकसहभागातून गावातील महिला बचत गटांचे उद्योग व्यवसाय,अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालय,आदर्श मियावाकी पॅटर्न,सुशोभित मंदिरे, मशिद,चर्च,बौद्ध विहार,वृक्षलागवड,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन,शुद्ध पिण्याचे पाणी,अंतर्गत रस्ते,

डिजिटल शाळा,अंगणवाडी,वाचनालय, ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी,महिला ग्रामसंघ कार्यालय,दफनभूमी,स्मशानभूमी,सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक ठिकाणची बैठक व्यवस्था,स्ट्रीटलाईट, गावातील स्वच्छता तसेच दिशादर्शक फलक आणि अभियान काळात करण्यात आलेली आकर्षक पेंटिंग व फ्लेक्स आदी विकास कामे शासनाच्या मुख्यमंत्री पंचायतराज लोकसहभागातून ग्रामपंचायत प्रशासनाने राबविली आहे.
तालुकास्तरीय आदिशक्ती द्वितीय पुरस्कार जाहीर होताच गावातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येऊन आनंद व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया
महिला व बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, तालुका प्रशासन, सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्य व पाठिंब्यामुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे.यात सर्व ग्रामस्थांचे मनस्वी आभार मानतो.गावाच्या विकासात सर्व ग्रामस्थांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिल्याने त्या सर्वांचे आभार-
सुदर्शन वाकचौरे,सरपंच पुनतगाव ग्रामपंचायत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







