नेवासा : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेवासा येथील आवारात सुरू झालेल्या खुला कांदा मार्केट मध्ये आतापर्यंत तीन महिन्यात ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची आवक झाली असून सुमारे ७ कोटी ५० लाख ६५ हजार ३०२ रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी दिली.

नेवासा आवारामध्ये दि.६ मे २०२६ पासून माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आले. खुला कांदा मार्केट सुरू झाल्यावर अगोदर दर मंगळवारी व गुरुवारी खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आले. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता रविवारी देखील खुला कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या वतीने घेण्यात आला. त्यानंतर रविवारी देखील सुरू झालेल्या खुला कांदा मार्केटला कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व आजपर्यंत मिळत आहे.

मे ते जुलै पर्यंत अशा तीन महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत एकूण ३ हजार ९२४ वाहनांची नोंद झाली. मे महिन्यात १९ हजार ३८७किंटल कांद्याची आवक झाली त्यात १ कोटी ४२ लाख २९ हजार ९११ रुपयांची उलाढाल झाली. जून महिन्यात २६ हजार ५५९ किंटल कांद्याची आवक झाली यामध्ये ३ कोटी २१ लाख ६२ हजार ८९ रुपयांची उलाढाल झाली. जुलै महिन्यात १४ हजार ७०४ किंटल कांद्याची आवक झाली त्यात २ कोटी ८६ लाख ७३ हजार ३१२ रुपयांची उलाढाल झाली समितीच्या नेवासा आवारात तीन महिन्यामध्ये ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची आवक झाली असून त्यामध्ये एकूण ७ कोटी पन्नास लाख ६५ हजार ३०२ रुपयांची उलाढाल झाली असल्याचे सभापती नंदकुमार पाटील यांनी सांगितले.

उच्च प्रतीचा कांदा नेवासा आवारात उपलब्ध होत असल्याने येथून दुबई येथे देखील कांदा निर्यात कैला गेला त्यामुळे नेवासा मार्केट कमिटीच्या कांदयाला परदेशातही मागणी होऊ लागली आहे. येथे खुला कांद्याचा लिलाव झाल्यानंतर लगेच रोख पेमेंट केले जाते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर त्याच बरोबर सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी नेवासा मार्केट कमिटी संचालक मंडळ हे प्रयत्न करत
असून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे वेळोवेळी होत असलेल्या मार्गदर्शनामुळे नेवासा कांदा मार्केट आता राज्यासह परदेशात प्रसिद्ध होऊ लागले असल्याचे सभापती नंदकुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

नेवासा कृषी उत्पन्न बाजार आवारात समितीच्या नेवासा कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने आजूबाजूच्या तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी ही नेवासा येथील मार्केट कडे आकर्षित झाला आहे, कांदा मार्केट मुळे नेवासा शहराची बाजारपेठ ही फुलू लागली असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने नेवासा येथील व्यापाऱ्यांनी ही मार्केट कमिटीच्या व्यवस्थापनाला धन्यवाद दिले आहे.
चौकट-आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार नेवासा येथे रविवारी दि.९ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कामिका एकादशीला मोठी यात्रा भरत असल्याने नेवासा मार्केट कमिटीमधील रविवारचा होणारा खुला कांदा लिलाव होणार नाही.
नंदकुमार पाटील सभापती


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







