आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
CCTV
CCTV

नेवासा – नेवासा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत युनिफ्रॉक्स इंडिया प्रा. लि. कंपनीच्या CSR निधीतून अत्याधुनिक CCTV संच बसविण्यात आले. हा उपक्रम नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे यांच्या प्रयत्नातून आणि श्री संदीप देशमुख (CA, Unifrox India Pvt. Ltd.) यांच्या सहकार्याने साकार झाला.

CCTV

यावेळी आयोजित कार्यक्रमास श्री संदीप देशमुख, प्रा. विलास नाबदे सर, श्री शेखर लंघे, श्री सतीश कडू, नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे, श्री सुधीर वाघ, श्री गोरख लष्करे, केंद्र प्रमुख नवनाथ वणवे, म्हस्के सर तसेच महाजन सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगत शिक्षण क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक केले.

CCTV

विशेष म्हणजे, यापूर्वीही श्री संदीप देशमुख यांच्या सहकार्याने आणि नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे यांच्या प्रयत्नातून युनिफ्रॉक्स इंडिया प्रा. लि. कंपनीकडून संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पेव्हिंग ब्लॉक व सोलर प्रकल्पासाठी सुमारे २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे शाळेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

CCTV
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

CCTV
CCTV
CCTV

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

CCTV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!