आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
धिरजनसिंग परदेशी

नेवासा-अहिल्यानगर येथील कर्तव्यदक्ष विद्युत कर्मचारी स्व. धिरजनसिंग परदेशी यांच्या हत्येचा निषेध व आरोपीवर कडक कारवाई करण्याबाबत, व या घटनेतील आरोपीना अटक होईपर्यंत नेवासा शहरासह तालुका कडकडीत बेमुदत बंद ठेवण्याचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने पो.नि.प्रताप दराडे यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथे महावितरणचे कर्मचारी श्री. धीरज परदेशी हे आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना, मुकुंदनगर येथील काही समाजकंटकांनी त्यांच्यावर जीवघेणा आणि अमानुष हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्री. धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.

धिरजनसिंग परदेशी


कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर असा हल्ला होणे आणि त्यांची निघृण हत्या केली जाणे, ही अतिशय गंभीर आणि निंदनीय बाब आहे. या घटनेमुळे संपूर्ण समाजात आणि शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

कठोर कलमांन्वये गुन्हाः या अमानुष हत्येतील सर्व दोषी आरोपींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर अतिशय कडक कलमांन्वये गुन्हे नोंदवले जावेत.जलद गती न्यायालयात खटलाः हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची किंवा कठोर शिक्षा सुनावण्यात यावी.वेळेत दोषारोपपत्रः पोलिसांकडून या प्रकरणाचे दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल केले जावे.

धिरजनसिंग परदेशी

या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल हिंदू समाज, नेवासा तर्फे दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी नेवासा शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धिरजनसिंग परदेशी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धिरजनसिंग परदेशी
धिरजनसिंग परदेशी
धिरजनसिंग परदेशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धिरजनसिंग परदेशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!