आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवसेना

माका | आदिनाथ म्हस्के :- नेवासा तालुक्यात ऑगस्ट महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्याने मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये खरीप पिकांसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. उभी पिके वाचविण्यासाठी मुळा उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडावे, अन्यथा शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (शिंदे गट)चे उपजिल्हाप्रमुख व नेवासा बाजार समितीचे मा सभापती भगवानराव गंगावणे यांनी दिला आहे.
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील महालक्ष्मी हिवरे, माका, देडगाव, पाचुंदा, तेकुडगाव, चिलेखनवाडी, नांदूर शिकारी, जेऊर हैबती,

शिवसेना

कुकाणा, वडुले यांसह नेवासा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विहिरी व बोअरवेलवरही मोठा ताण पडत असून, त्यातच अपुऱ्या दाबाने वीजपुरवठा होत असल्याने सिंचन करणेही अडचणीचे ठरत आहे.
सध्या मुळा धरणात सुमारे ७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने उभ्या पिकांना जीवदान देण्यासाठी मुळा उजव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडणे आवश्यक असल्याचे भगवानराव गंगावणे यांनी सांगितले.

शिवसेना

शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शिवसेना (शिंदे गट)च्या पदाधिकारी व शिवसैनिकांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित आवर्तन जाहीर करण्याची मागणी केली असून, मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

शिवसेना

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवसेना
शिवसेना
शिवसेना

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!