
नेवासा: तालुक्यातील प्रवरा संगम येथील श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शिक्षक वृंद यांच्यावतीने थोर समाजसेवक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले मुख्याध्यापक बाबासाहेब गायकवाड यांनी डॉ दाभोळकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला

सर्व उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व अभिवादन केले याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक व थोर विवेक वादी डॉक्टर दाभोळकर यांच्या कार्याबद्दल सविस्तर विवेचन केले युवक पिढीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याची धुरा व विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रवृत्ती केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली . भोंदूगिरी, जादूटोणा व बुवाबाजी यासारखे प्रकार पुनश्च डोके वर काढत आहेत त्यामुळे अंनिस चे कार्य प्रभावी करणे काळाची गरज आहे

जिल्हा कार्यकर्ते बी.के. चव्हाण मामा यांनी प्रवरा संगम परिसरात कृती कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली जाईल असे आश्वासित करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पर्यवेक्षक विनोद सरोदे महेश दरेकर बाबासाहेब लाळगे, विजय कडाळे व अध्यापिका श्रीमती प्राजक्ता रासने विद्यार्थी उपस्थित होते सर्वांचे आभार हायस्कूलचे पर्यवेक्षक विनोद सरोदे यांनी मानले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







