आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
यशवंतराव चव्हाण

पदव्युत्तर ऑर्थोडोंटिक्स विभाग, आधुनिक ‘मोबाइल डेंटल व्हॅन’सह अहिल्यानगर–वडगाव गुप्ता मोफत दंत रुग्ण बससेवेचा प्रारंभ

अहिल्यानगर – यशवंतराव चव्हाण मेमोरियल मेडिकल अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय व हॉस्पिटल, वडगाव गुप्ता येथे मा. खा. यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेतून विविध अत्याधुनिक सुविधा व रुग्णसेवांचा शुभारंभ बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात करण्यात आला. यावेळी दंत पदव्युत्तर विभागातील ऑर्थोडोंटिक्स व डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स, अत्याधुनिक मोबाइल डेंटल व्हॅन तसेच अहिल्यानगर शहर ते यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, वडगाव गुप्ता मोफत दंत रुग्ण बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर येथील साई दीप हॉस्पिटलचे डॉ. दीपक एस. एस. होते. प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुषार पाटील यांनी केले.

यशवंतराव चव्हाण


यावेळी बोलताना संस्थेचे विश्वस्त
व मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख म्हणाले, “ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार दंत उपचार सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने महाविद्यालयाच्या माध्यमातून अत्याधुनिक आरोग्य सुविधा विकसित करण्यात येत आहेत.” अहिल्यानगर शहरातून महाविद्यालयापर्यंत ये-जा करणाऱ्या दंत रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आधुनिक काळात दंतचिकित्सा क्षेत्रात कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, इम्प्लांटोलॉजी यांसह विविध अत्याधुनिक उपचार पद्धतींचा समावेश झाला असून, या आधुनिक उपचार सुविधा यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण

मुख व दंत आरोग्याचा संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जवळचा संबंध असल्याने दंत आरोग्यसेवेला महाविद्यालयाकडून विशेष महत्त्व दिले जात असल्याचे उदयन गडाख यांनी नमूद केले. मा. खा. यशवंतराव गडाख व मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रम व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘खडकाळ माळरानावर महाविद्यालय उभारणे हे शिवधनुष्य’
प्रमुख पाहुणे नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, वडगाव गुप्ता यासारख्या ठिकाणी दंत महाविद्यालय उभारून विद्यार्थी व रुग्णांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने महाविद्यालयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णांनाही महाविद्यालयाच्या माध्यमातून सेवा दिली जात असल्याचे त्यांनी कौतुकाने नमूद केले.

यशवंतराव चव्हाण


कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक एस. एस. म्हणाले, “एका खडकाळ माळरानावर दंत महाविद्यालय उभे करून त्याचा राज्यात नावलौकिक व्हावा, हे शिवधनुष्य होते; ते गडाख परिवाराने पेलले.” या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी दंतवैद्य झाले असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थीही या महाविद्यालयात शिक्षण घेतात, याचा विशेष अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
उदयन गडाख व नेहल गडाख ही भावंडे महाविद्यालयाचे व्यवस्थापन समर्थपणे पाहत असून, गडाख कुटुंबाची तिसरी पिढीही सामाजिक व शैक्षणिक कार्यात योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले. मा. खा. यशवंतराव गडाख, मा. मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी महाविद्यालय व परिसरात वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाला प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
“समोरचा माणूस चांगले काम करत असेल तर त्याचे कौतुक करा, लोकांचे प्रेम मिळवा आणि जिव्हाळा जपा; यातूनच समाजाची खरी प्रगती साधली जाईल,” असा संदेश डॉ. दीपक एस. एस. यांनी यावेळी दिला.

यशवंतराव चव्हाण

डॉ. सुभाष देवढे यांनीही मनोगत व्यक्त केले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निदान अधिक अचूक
यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयात सन २०२२ मध्ये जिल्ह्यात सर्वप्रथम सीबीसीटी मशीन उपलब्ध करून देण्यात आले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुख व दंत रोगांचे अधिक अचूक निदान करणे शक्य झाले आहे. तसेच प्रोस्थोडोंटिक्स विभागात आधुनिक डिजिटल स्कॅनर उपलब्ध असून, त्याद्वारे दातांचे अचूक डिजिटल इम्प्रेशन घेण्याची सुविधा आहे. त्यामुळे रुग्णांवरील उपचार अधिक अचूक, जलद व प्रभावीपणे करता येत आहेत.
दंत रोपणासाठी महाविद्यालयात स्वतंत्र विभाग कार्यरत असून, येथे विविध आधुनिक दंत उपचार सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयात दरमहा ५० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणार ‘मोबाइल डेंटल व्हॅन’
नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मोबाइल डेंटल व्हॅनमध्ये आधुनिक उपकरणांनी सुसज्ज दंतचिकित्सालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये दोन सुसज्ज डेंटल खुर्च्या, डिजिटल एक्स-रे, आरव्हीजी यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. या माध्यमातून दंतचिकित्सक थेट गरजू रुग्णांपर्यंत पोहोचून तपासणी, उपचार तसेच दंत आरोग्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

यशवंतराव चव्हाण


मोबाइल डेंटल व्हॅनच्या माध्यमातून आठवड्यातून दोन वेळा दंत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना मुख व दंत आरोग्याचे महत्त्व, दातांची योग्य निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचारही केले जाणार आहेत.
ग्रामीण भागासाठी दोन सॅटेलाईट क्लिनिक उभारण्याचा मानस
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या दंत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन सुसज्ज सॅटेलाईट क्लिनिक उभारण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. सध्या पाईपलाईन परिसरात एक सॅटेलाईट क्लिनिक कार्यरत असून, त्याद्वारे स्थानिक नागरिकांना दंत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित दंतचिकित्सक आणि मोबाइल दंतचिकित्सा सेवांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण दंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. नव्या सुविधांचा अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा व संशोधन केलेल्या डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण


यावेळी व्यासपीठावर विश्वासराव गडाख, नानासाहेब तुवर, मुळा कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख, विजयराव गडाख, मुळाचे माजी व्हा. चेअरमन कडूबाळ कर्डीले, व्हा. चेअरमन बाळासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, बाप्पूसाहेब शेटे, पांडुरंग निपुंगे, रामभाऊ जगताप, डॉ. शिवाजी शिंदे, प्रभाकर कोलते, रंगनाथ जंगले, बाळासाहेब नवले, वैभव नवले, आण्णासाहेब पटारे, दत्तात्रय बेल्हेकर, डॉ. माऊली दरंदले,दिलीपराव लोखंडे,दत्तात्रय ब-हाटे, प्रकाश भालके, बाबा घुले,अमित रासने,संजीव तनपुरे, दिनकर घावटे, चंद्रकांत टेमक, भास्कर भुसारी, वसंत कुसळकर, दिलीपराव मते, चंद्रकांत आंबडे, ज्ञानेश्वर औताडे, संजय सावंत,अनिल लहारे, संजय दरंदले, डॉ. शंकरराव शिंदे, आशिष कावरे, निलेश जोशी, जालिंदर गवळी ,राजेंद्र बोरुडे,उदय पालवे,जयराम काळे, रणजित जाधव,अरुण घावटे,सुनील झिने, अनिल वाघ
आदीसह
नेवासा तालुक्यातील व अहिल्यानगर शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहल प्रशांत गडाख यांनी आभार मानले. डॉ. अनुराधा आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले.

यशवंतराव चव्हाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यशवंतराव चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!