आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दहीहंडी

नेवासा – नेवासा येथील मारुती चौकातील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या जय हनुमान मित्र मंडळाच्या मानाच्या दहीहंडीचे पूजन संत महंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन नेवासा शहरातील दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
शिवएकता मित्र मंडळाने मानाची असलेली ही पहिली दहीहंडी फोडली.

दहीहंडी


                         मारुती चौकात झालेल्या दहीहंडी शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व मार्गदर्शक वेदांताचार्य हभप श्री देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री,मध्यमेश्वर मंदिराचे प्रमुख महंत श्री ऋषिनाथजी महाराज,संत तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त भागवताचार्य हभप श्री अंकुश महाराज जगताप, श्री चक्रधर स्वामी महानुभाव आश्रमाचे उत्तराधिकारी श्री धनंजय मुनी महाराज,पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार,उपनिरीक्षक विकास पाटील,अँड.संजय सुखदान,व्यापारी राजेंद्र मुथ्था,नगरसेवक महेश लोखंडे,संदीप सरकाळे,राजू काळे, जालिंदर गवळी,संभाजी धोत्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

दहीहंडी


            उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाल भगवान श्रीकृष्ण, बजरंग बली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जनसेवक स्वर्गीय राजेंद्र मापारी व स्वर्गीय सौ.सीमाताई मापारी यांचा शिक्षक दिनी स्मृती दिन असल्याने त्यांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रम संयोजक जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.उपस्थित मान्यवरांचा सन्मान जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.
           यावेळी झालेल्या मानाच्या दहीहंडी कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक संदीप सरकाळे,नगरसेवक संभाजी धोत्रे,योगेश रासने,रूपेश उपाध्ये,राहुल शेठ मुंडलिक,जयवंत मापारी,दिपक धोत्रे,मुकुंद गुरव, रविंद्र मापारी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

दहीहंडी


या कार्यक्रमासाठी न्यू साई मंगल ज्वेलर्सचे अनिकेत सोनार,प्रायमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. निलेश लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील साहेब यांचे विशेष पाठबळ लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले.नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल मापारी,सदस्य अजिंक्य जगताप,सोमेश मापारी,ॲड.अनिकेत मापारी,गणेश चौधरी,शिवाजी शेजुळ,समीर मापारी,शरद पंडुरे,वरद वाघ,अनुज बोरुडे, समर्थ डहाळे,वैभव माळवे,ऋषिकेश वर्मा,अजय रासने, देवेंद्र वर्मा,ज्ञानेश्वर देशमाने,अक्षय पोतदार यांनी विशेष प्रयत्न केले.मानाची असलेली दहीहंडी शिवएकता मित्र मंडळाने फोडली यावेळी जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने ट्रॉफी वितरण करण्यात आले

दहीहंडी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दहीहंडी
दहीहंडी
दहीहंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दहीहंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!