नेवासा : बदलत्या राजकीय परिस्थितीतही पक्षाची विचारधारा, नेतृत्व आणि निष्ठा यांना सातत्याने जपणारे सच्चे शिवसैनिक म्हणून रामदासजी गोल्हार यांची ओळख आहे. गेल्या २७ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहून संघटनात्मक बांधणीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रामदासजी गोल्हार यांनी नेवासा तालुक्यासह परिसरात शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने काम केले. गावागावांत शिवसेनेच्या शाखांची उभारणी करत त्यांनी तरुणांना संघटनेशी जोडले आणि अनेक शिवसैनिकांना पक्षाच्या प्रवाहात आणले.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे तसेच गरजूंच्या मदतीसाठी तत्पर राहणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये राहिली आहेत. नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजकीय परिस्थितीत अनेक बदल झाले, मात्र त्यांनी शिवसेनेची साथ आणि पक्षनिष्ठा कायम राखली.

शिक्षण क्षेत्रातूनही सामाजिक बांधिलकी
राजकीय आणि सामाजिक कार्यासोबतच शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही रामदासजी गोल्हार यांनी केले. गरीब, वंचित आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने त्यांनी राजा शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली.
सन १९९७ मध्ये नेवासा फाटा आणि कौठा येथे माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. कौठा येथील राजे संभाजी विद्यालय १०० टक्के अनुदानित असून पिचडगाव येथील सुदर्शन विद्यालय ४० टक्के अनुदानित आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी देण्याच्या त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

निष्ठावंत शिवसैनिकाच्या कार्याचा गौरव
गेल्या २७ वर्षांपासून रामदासजी गोल्हार यांच्यासोबत काम करणाऱ्या असंख्य शिवसैनिकांच्या मनात त्यांच्या कार्याबद्दल आदराची भावना आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हाप्रमुखपदी झालेली त्यांची नियुक्ती हा त्यांच्या प्रदीर्घ पक्षनिष्ठेचा सन्मान असल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे.

रामदासजी गोल्हार यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेला नवी उभारी मिळेल आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २७ वर्षांची अखंड पक्षनिष्ठा, भगवा विचार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची बांधिलकी यामुळे रामदासजी गोल्हार हे सच्च्या शिवसैनिकाचे उदाहरण ठरले आहेत.
शब्दांकन : प्रा. शकुर इनामदार
सुदर्शन इंग्लिश स्कूल, पिचडगाव, ता. नेवासा


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







