आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पाणी

नेवासा : मुळा धरणाच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नावर 2023 मध्ये घोडेगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल फौजदारी गुन्ह्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह प्रमुख नऊ आंदोलकांनी अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी लावली.

बुधवार, 16 सप्टेंबर 2026 रोजी न्यायमूर्ती जी. जी. सोनी यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

पाणी

नेवासा तालुक्यात पाण्याची टंचाई असताना मुळा धरणाचे पाणी जायकवाडी धरणाकडे सोडण्याच्या निर्णयाला विरोध करत शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान हजारो शेतकऱ्यांसह रास्ता रोको करण्यात आल्याचा उल्लेख या प्रकरणात करण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान अहिल्यानगर-संभाजीनगर राज्यमार्ग सुमारे तीन तास रोखून धरत जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करण्यात आला होता. त्यानंतर गडाख यांच्यासह प्रमुख आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाणी

या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया आता सुरू असून, 30 सप्टेंबरच्या पुढील सुनावणीकडे नेवासा तालुक्यातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पाणी
पाणी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाणी
पाणी
पाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!