आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
व्याख्यान

नेवासा – नेवासा शहरात धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे जनसेवक स्वर्गीय राजेंद्र मापारी व नगरसेविका स्वर्गीय सौ.सीमाताई राजेंद्र मापारी यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. विनोद बाबर यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे      

व्याख्यान

मापारी कुटुंबियाच्या वतीने व्याख्यानाचे व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेवासा शहरात मागील वर्षी सामाजिक,धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणारे गोरगरिबांचे कैवारी जनसेवक राजेंद्र मापारी व त्यांच्या पत्नी सौ.सिमाताई राजेंद्र मापारी यांचे दुःखद निधन झाले होते.सदरची घटना एखाद्या चित्रपटा सारखी घडली होती.मापारी दाम्पत्याच्या जाण्याने संपूर्ण नेवासा तालुक्यात शोककळा पसरली होती.

व्याख्यान

या दाम्पत्याला जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांच्या मुलांनी आपल्या आईवडीलांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व समाज प्रबोधनकार प्रा.डॉ.विनोद बाबर सर यांचे व्याख्यानाचे आयोजन नेवासा येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालय पाकशाळा येथे गुरुवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केले असून कार्यक्रमाचा जास्तीत जास्त श्रोत्यांनी व नेवासा तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मापारी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्याख्यान
व्याख्यान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

व्याख्यान
व्याख्यान
व्याख्यान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

व्याख्यान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!