नेवासा – ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या विद्यालयात शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी राजर्षी शाहू महाराज सभागृहात शिक्षक पालक सहविचार सभा पार पडली. या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी हे होते. तर नेवासा नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. जयश्री शिंदे, पालक प्रतिनिधी श्री.राजेंद्र गायकवाड, सौ. सुनिता शिंदे,पर्यवेक्षक सुनील धस, श्री. काकासाहेब काळे,श्री. भाऊसाहेब चाबुकस्वार, श्री. जनार्दन बनकर, श्रीम. अनिता वालझाडे मंचावर उपस्थित होते. प्रारंभी भाऊसाहेब चाबुकस्वार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

एसएससी परीक्षा मार्च 2026 व प्रथम घटक चाचणी परीक्षा 2026 च्या निकालाचा आढावा दहावीचे वर्गशिक्षक श्री. भाऊसाहेब चाबुकस्वार, श्री. जनार्दन बनकर, श्रीम. अनिता वालझाडे यांनी घेतला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चैतन्य तनपुरे याने मनोगत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी श्री. राजेंद्र गायकवाड यांनी ज्ञानोदय विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक केले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन वर्ग घेण्यात यावा असे सूचित केले. श्री.विवेकानंद नन्नवरे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना संस्थेने अद्ययावत प्रश्नपेढी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल असे सांगितले.

पर्यवेक्षक सुनील धस यांनी वेळेचे योग्य नियोजन केल्यास व नियोजन करून अभ्यास केल्यास आपण अपेक्षित यश निश्चितपणे प्राप्त करू शकतो असे सांगितले.प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सध्याच्या काळात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांवरील संस्कार अत्यंत महत्त्वाचे असून काळाच्या ओघात पालकांनीही बदलले पाहिजे, असे मत व्यक्त केले. या सहविचार सभेसाठी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. शिक्षक संजय आखाडे यांनी सूत्रसंचालन केले तर अनिता वालझाडे यांनी आभार मानले. या सहविचार सभेसाठी इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षक व विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







