आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
ज्ञानेश्वर मंदिर
ज्ञानेश्वरी जयंती

नेवासा – श्रीक्षेत्र नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वाचकांनी निरंजनी अथवा समई तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथासह दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ज्ञानेश्वरी जयंती

यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘ज्ञानेश्वरी वाचनातून आलेले अनुभव कथन’ हा उपक्रम. ज्ञानेश्वरी वाचनामुळे आलेले आध्यात्मिक अनुभव वाचकांनी स्वतःच्या शब्दांत उपस्थितांसमोर मांडावेत, यामागील उद्देश इतर भाविकांना ज्ञानेश्वरी वाचनाची प्रेरणा मिळावी आणि पारायण करणाऱ्या वाचकांची संख्या वाढावी हा आहे. अनुभव कथनासाठी इच्छुकांनी पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वरी जयंती

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता भाविकांच्या उपस्थितीने व दिंडी प्रदक्षिणेच्या तयारीने होणार आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण वाचकांना अध्यायनिहाय बसण्यासाठी रेषांची आखणी, अनुभव कथनाची तयारी, संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई तसेच ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंद बाबा यांच्या विद्यार्थी पात्रांची तयारी करण्यात येणार आहे.

ज्ञानेश्वरी जयंती

दुपारी ३.१० वाजता माऊलींच्या मंदिरात अनुभव कथनाचा कार्यक्रम सुरू होईल. प्रत्येक सहभागीला पाच मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर ३.५० वाजता दिंडी प्रदक्षिणेला प्रारंभ होऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिंडी सोहळा ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरात पोहोचविण्याचे नियोजन आहे.

ज्ञानेश्वरी जयंती

सायंकाळी ६ वाजता सर्व वाचकांनी आपापल्या अध्यायानुसार निश्चित केलेल्या रेषेवर बसून दिवा प्रज्वलित करावा. सूचना मिळाल्यानंतर सामूहिक ज्ञानेश्वरी वाचनास सुरुवात होईल. वाचन पूर्ण झाल्यानंतर जयघोष, वाचनास लागलेला वेळ जाहीर करणे, फटाक्यांची आतषबाजी आणि त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीची सार्वजनिक आरती होणार आहे.

यावेळी अनुभव कथन करणारे ज्ञानेश्वरी वाचक, सहकार्य करणारे भाविक तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वरी आरतीनंतर ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष, माजी आमदार अभंग साहेब, विश्वस्त मंडळ तसेच वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर सार्वजनिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होऊन उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येईल.

ज्ञानेश्वरी जयंती

विशेष सूचना: नियोजनानुसार ज्ञानेश्वरीचा अध्याय किंवा ओवी आठवत नसलेल्या भाविकांनी आयोजकांशी संपर्क साधावा. नवीन सहभागी होणाऱ्या भाविकांनी ज्या अध्यायातील ओवी म्हणायची आहे, त्या अध्यायाच्या निश्चित रेषेवर बसावे. सर्व भाविकांना सामावून घेतले जाणार असून, प्रत्येकाला दिवा प्रज्वलित करून ज्ञानेश्वरी वाचनात सहभागी होता येणार आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी संबंधित अध्यायाच्या रेषेवरच बसणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी ह.भ.प. रामेश्वर महाराज कंठाळे (सर) – मो. ९७६३६४७८७६ किंवा श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वरी जयंती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वरी जयंती
ज्ञानेश्वरी जयंती
ज्ञानेश्वरी जयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वरी जयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!