आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रुग्णालय

मानवाधिकार हक्क संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आक्रमक; आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर शासनाला जाब विचारण्याची भूमिका

नेवासा : महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार, आवश्यक औषधे आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, काही ठिकाणी डॉक्टरांची अनुपलब्धता, औषधांचा तुटवडा, तपासण्यांसाठी विलंब आणि रुग्णांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर येतात. या प्रश्नांकडे राज्य शासन आणि आरोग्य प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी ठाम भूमिका मधुसूदन उपभोक्ता राष्ट्रीय मानवाधिकार हक्क संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेंद्रसिंह उर्फ बादल कैलास परदेशी यांनी मांडली आहे.

रुग्णालय

राज्यातील शासकीय रुग्णालये ही गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधार आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये. आरोग्यसेवेतील हलगर्जीपणा किंवा गैरसोयींबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष झाले पाहिजे, अशी मागणी परदेशी यांनी केली.

रुग्णालय

राज्यातील कोणत्याही शासकीय रुग्णालयात अन्याय, उपचारांबाबत हलगर्जीपणा, औषधांचा तुटवडा किंवा आरोग्यसेवेसंदर्भात काही तक्रार असल्यास नागरिकांनी बादल परदेशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तक्रारदारांनी रुग्णालयाचे नाव, घटनेचा तपशील आणि उपलब्ध कागदपत्रे द्यावीत, जेणेकरून संबंधित प्रकरणाचा योग्य प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करता येईल.

“रुग्णांचे हक्क महत्त्वाचे आहेत; आरोग्यसेवेतील त्रुटींकडे दुर्लक्ष होता कामा नये. अशी भूमिका बादल परदेशी यांनी व्यक्त केली.

रुग्णालय
रुग्णालय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रुग्णालय
रुग्णालय
रुग्णालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रुग्णालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!