आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

सोनई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिशिंगणापूर येथे शनिमूर्तीचे दर्शन घेऊन तैलाभिषेक केला. त्यानंतर सोनई येथे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत गडाख कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.

आदित्य ठाकरे

यापूर्वी कुकाणा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राचा शुभारंभ आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन मिळणार आहे.

आदित्य ठाकरे

शनिशिंगणापूर येथे आगमन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शनिमूर्तीचे दर्शन घेत तैलाभिषेक केला. यानंतर त्यांनी सोनई येथे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सामाजिक तसेच विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.

आदित्य ठाकरे

या सदिच्छा भेटीप्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते आमदार आदित्य ठाकरे, आमदार अंबादास दानवे आणि आमदार सुनील शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वासराव गडाख, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनीलराव गडाख, मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख, माजी सभापती सुनीताताई गडाख, राजेंद्र दळवी, रामदास गोल्हार आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे

यावेळी उदयन गडाख यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा लेख समाविष्ट असलेला ‘ऋतुरंग’ दिवाळी अंक आमदार आदित्य ठाकरे यांना भेट दिला. या भेटीमुळे गडाख कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीयांमधील स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा मिळाला.

आदित्य ठाकरे यांचा देवस्थानच्या अनिल दरंदले जनसंपर्क अधिकारी वतीने सत्कार केला. यावेळी देवस्थान परिसरात आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती.

आदित्य ठाकरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आदित्य ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!