नेवासा – जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणुकदारांच्या बदलत्या कलानुसार भारतीय सराफा बाजारात गुरुवारी मोठी खळबळ पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतीत गुरुवारी (५ फेब्रुवारी) मोठी घसरण झाली आहे. विशेषतः चांदीच्या दरात झालेली विक्रमी घट ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे.गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या दरात ५०२०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १५,९४,४०० रुपयांवरुन १५,४४,२०० रुपये इतका झाला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५०२० रुपयांची घसरणं झाली आहे. यामुळे हा दर १,५९,४४० रुपयांवरुन १,५४,४२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४६००० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १४,६१,५०० रुपयांवरुन १४,१५,५०० रुपये इतका झाला आहे.

१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४६०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर १,४६,१५० रुपयांवरुन १,४१,५५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.१८ कॅरेट सोन्याच्या दरात ३७६०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे १८ कॅरेट सोन्याचा १०० ग्रॅम दर ११,९५,८०० रुपयांवरुन ११,५८, २०० रुपये इतका झाला आहे. तर १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याच्या दरात ३७६० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर १,१९,५८० रुपयांवरुन १,१५,८२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.
चांदीचा दर किती ?
सोन्यापेक्षाही जास्त चर्चा सध्या चांदीच्या दराची होत आहे. चांदीच्या दरात तब्बल २०,००० रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळत आहे. औद्योगिक मागणीत झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या साठ्यात झालेली वाढ यामुळे ही घसरण झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घसरणीमुळे चांदी आता स्वस्त दरात उपलब्ध होणार असल्याने दागिने आणि भांडी खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या घसरणीमुळे चांदीचा दर ३,००,००० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

