आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
फेरफार

नेवासे – आईच्या नावे असलेल्या जमिनीचा फेरफार उपविभागीय अधिकारी नगर यांच्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यासाठी बारा हजार रुपयाची मागणी करून नेवासे मंडळाधिकारी कार्याल्यासमोर बाहेर बसणाऱ्या एका खासगी इसमाने चक्क फोन पे वरून पाच हजार रुपये रक्कम घेवून पुन्हा राहिलेले सात हजार रुपये मागणाऱ्या इसमाला नगर लाचलूच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडून यशस्वी कारवाई केली.

फेरफार

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,नेवासे बुद्रूक (ता.नेवासे) येथील आईच्या नावे असलेली ८० आर क्षेत्रफळ जमिनीचा फेरफार रद्द करण्याच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर आरटीएस (दि.२१०/२०२५ या प्रमाणे दिलेला फेरफार रद्द करण्याच्या आदेशाची अंमलबजावनी करण्यासाठी मंडळ अधिकारी नेवासे खुर्द यांना तक्रारदार समक्ष भेटले असता नेवासे मंडळाधिकारी कार्यालयाबाहेर असणारा खाजगी इसम गणेश घोरपडे हा तक्रारदारांना म्हणाला की, मी तुमचे काम मंडळाधिकारी बाबासाहेब माने यांच्याकडून करून देतो, मला व बाबासाहेब माने मंडळाधिकारी यांना, १२ हजार रुपये द्या,असे मंडळाधिकारी कार्याल्यासमोर बसत असलेला गणेश घोरपडे म्हणाला असता तक्रारदार यांच्या भावाने या इसम घोरपडे यांना फोन पे वरून पाच रुपये दिले.

त्यानंतर (दि.१) मार्च २०२६ रोजी खाजगी इसम घोरपडे यांनी तक्रक्ररदार यांची भेट घेऊन सांगितले की, आता मी मंडळाधिकारी बाबासाहेब माने यांच्याकडून तुमचे काम करून दिले,त्यामुळे उर्वरित सात हजार रुपये मला देऊन टाका,असे म्हणून खाजगी इसम श्री गणेश घोरपडे हा तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार केलेली असतांना सदर तक्रारीच्या अनुषंगाने नेवासे खुर्द, (ता.नेवासे) येथे लाचेची मागणी नगर शाखेच्या लाचलूच पत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता यावेळी यातील खाजगी इसम गणेश घोरपडे, सेतु व्यवसाय (गणेश मल्टी सर्विहसेस) यांनी तक्रारदार यांच्याकडे मंडलाधिकारी बाबासाहेब माने,यांच्याकरीता सात हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली व या यशस्वी सापळा कारवाईत लाचेची मागणी केलेली सदरची सात हजार रुपये लाच रक्कम गणेश मल्टीसव्हिसेस, नेवासा खुर्द,ता. नेवासे येथे गणेश घोरपडे खाजगी इसम यांनी स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

फेरफार

सापळा कारवाई लाचलूच पत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.कॉ.गजानन एकनाथ गायकवाड,पो.कॉ.सचिन सुटुक, वैभव सुपेकर,चालक पो.हे.कॉ.हारूण शेख तपास अधिकारी अजित त्रिपुटे यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की,भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागण्याऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

फेरफार
फेरफार
फेरफार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

फेरफार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!