आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
महिला व बाल कल्याण

बोगस वसुली करणाऱ्या किट सेंटरवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी!

नेवासे – नेवासे पंचायत समितीच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गत ‘बाल-आधार’ योजनेतील ५ वर्षांखालील लहान मुलांच्या आधार नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी बालविकास प्रकल्प खात्याकडून सुरु केलेली असतांनाही मात्र भेंडा आणि कुकाण्यामधील आधार कीट सेंटरमधून चक्क सरकारी नियमांना तिलांजली देवून प्रत्येकी बालकांच्या माता – पित्यांकडून या आधार नोंदणीसाठी प्रतिशुल्क दिडशे रुपये बोगस उकळले जात असल्याची लेखी तक्रार सुकळीचे माजी सरपंच सचिन साबळे आणि सोसायटी चेअरमन संदिप पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी पुराव्यासह दाखल केली असल्यामुळे या बाल आधार योजनेचा घोटाळा आता उघड झालेला आहे.

बालविकास प्रकल्प विभागाकडुन डिजिटल आधार कार्ड हे बालकाची ओळख पटविण्यासाठी,अंगणवाडी सेवा, पोषण,लसीकरण आणि इतर शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विशेषता: हे बाल आधारकार्ड अनिवार्य केलेले असतांना मात्र हे आधार कीट शासकीय कार्यालयात चालविले जात नसून इतरत्र चालवून तसेच शासकीय नियमानुसार शुल्क आकारण्याऐवजी प्रति बाल आधार कार्डासाठी बोगसपणे सर्रास दीडशे रुपये वसुली केली जात असल्याची लेखी तक्रार पुराव्यासह सादर केल्यामुळे बोगस वसुली करणाऱ्या या bhenda – कुकाणा सेंटरवर आता कारवाईची टांगती तलवार उभी राहिलेली आहे.

महिला व बाल कल्याण

या भेंडा – कुकाणा येथील संबंधित केंद्र चालक नेमणुक असलेल्या शासकीय जागेत अंगणवाडी,ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत न चालविता आपल्या सोयीनुसार आणि आर्थिक नफेखोरीसाठी चुकीच्या पद्धतीने पैसे वसुली करून मनमानी पैसे उकळले जात असल्याचे त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटलेले असून बाल आधार कार्डासाठी सरकारी नियमांना तिलांजली देवून बोगस वसुली करणाऱ्यां आधार किट चालकांना कोणाचा राजाश्रय लाभला? असा सवाल या निमित्ताने उपस्थितीत होत असून या बाल आधारकार्ड वाटप करण्यातून लाखो रुपयांचा चांदा वसुल झाला असल्याची तालुक्यात दबक्या आवाजात चांगलीच चर्चा सुरु आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महिला व बाल कल्याण
महिला व बाल कल्याण
महिला व बाल कल्याण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महिला व बाल कल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!