नेवासा – नेवासा नगरपंचायत कार्यालयापासून ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावर ज्ञानोदय शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. शाळेसमोरच कचऱ्याचे ढीग साचलेले असल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साचलेल्या कचऱ्यातून डास, माशा व विविध कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया, पोटाचे विकार, त्वचारोग यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली
असून ही परिस्थिती स्वच्छ भारत अभियानच्या उद्दिष्टांना हरताळ फासणारी असल्याचे मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात कहार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संतोष जगन्नाथ पंडुरे यांनी प्रशासनाकडे तात्काळ निवेदन देत संबंधित मार्गावर दररोज नियमित साफसफाईसाठी स्वतंत्र स्वच्छता पथक नेमावे, कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दंडात्मक कारवाई करावी, शाळा परिसरात कंपाऊंड उभारावे व वृक्षारोपण करून परिसर स्वच्छ करावा आदी मागण्या केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने तातडीने पाहणी करून ठोस कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








